lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 09:21 AM2022-05-17T09:21:46+5:302022-05-17T09:22:46+5:30

गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली.

7940 bank scams in one year 40295 crore sunk big blow to pnb sbi and boi | अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मार्च २०२२ ला संपलेल्या वित्तीय वर्षात बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ५१ टक्क्यांनी कमी होऊन ४०,२९५.२५ कोटी रुपयांवर आला असल्याची माहिती आरबीआयने दिली.

बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये १२ बँकांचे ८१,९२१.५४ कोटी रुपये विविध घोटाळ्यांत अडकलेले होते. मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी दिलेल्या अर्जावर आरबीआयने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, २०२१-२२ मध्ये घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या. २०२०-२१ मध्ये ही संख्या ९,९३३ इतकी होती. २०२१-२२ या वर्षातील घोटाळ्यात ९,५२८.९५ कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेचे आहेत. या बँकेत एकूण ४३१ घोटाळे उघडकीस आले आहेत. एसबीआयमध्ये ४,१९२ घोटाळे झाले आहेत.

इंडियन बँकेतील २११ घोटाळ्यांत २,०३८.२८ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेतील ३१२ घोटाळ्यांत १,७३३.८० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रातील ७२ घोटाळ्यांत १,१३९.३६ कोटी रुपये अडकले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ७७३.३७ कोटी रुपये घोटाळ्यात अडकले आहेत.

सर्वाधिक घोटाळे या बँकांत...

घोटाळे     अडकलेली रक्कम
पंजाब नॅशनल बँक     ४३१    ९,५२८.९५ कोटी
स्टेट बँक ॲाफ इंडिया    ४,१९२    ६,९३२.३७ कोटी
बँक ॲाफ इंडिया     २०९    ५,९२३.१९ रुपये
बँक ऑफ बडोदा     २८०    ३,९८९.३६ कोटी
युनियन बँक     ६२७    ३,९३९ कोटी

Web Title: 7940 bank scams in one year 40295 crore sunk big blow to pnb sbi and boi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.