Lokmat Money >गुंतवणूक > Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 11 June: गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. खरेदीपूर्वी जाणून घ्या सोन्या-चांदीचा नवा दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:08 IST2025-06-11T15:05:01+5:302025-06-11T15:08:42+5:30

Gold Silver Price 11 June: गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. खरेदीपूर्वी जाणून घ्या सोन्या-चांदीचा नवा दर.

11 june 2025 gold silver price gold and silver prices fall silver also becomes cheaper from its highest level check new prices before buying | Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 11 June: गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. चांदीचा भाव १०७००० या त्याच्या आजवरच्या उच्चांकावरून १०६१९४ रुपये प्रति किलोवर घसरला आहे. त्यात ८०६ रुपयांची घट झाली. जीएसटीसह चांदीची किंमत १०९३८९ रुपयांवर पोहोचली आहे. तर जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत ९८९३६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. आज जीएसटीशिवाय असलेल्या सोन्याच्या दरात ३०४ रुपयांची घसरण झाली आणि ९६०५५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे नवीन दर

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील ३०३ रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९५६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत दुपारी २७९ रुपयांनी कमी झाली आणि ती ८७९८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील २२८ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७२०४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत १७८ रुपयांनी कमी झाली आणि ती ५६१९२ रुपयांवर आली.

उच्चांकापेक्षा ३०४५ रुपयांनी स्वस्त आहे सोनं

सराफा बाजारात, सोनं त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा ३०४५ रुपये स्वस्त आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोनं ९९१०० रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर होतं. या वर्षी सोनं सुमारे २०३१५ रुपयांनी आणि चांदी २००१० रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोनं ७६०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ८५६८० रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​उघडली. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदी देखील ८६०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​बंद झाली.

Web Title: 11 june 2025 gold silver price gold and silver prices fall silver also becomes cheaper from its highest level check new prices before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.