चिखली निवडणूक निकाल : भाजपच्या श्वेता महालेंची विजयी घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 05:01 PM2019-10-24T17:01:04+5:302019-10-24T17:03:56+5:30

 Chikhali Vidhan Sabha Election Results 2019:  श्वेता महालेंच्या विजयाच्या घोषणेचीच केवळ औपचारिकता बाकी आहे.

Chikhali Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Shweta Mahale win | चिखली निवडणूक निकाल : भाजपच्या श्वेता महालेंची विजयी घोडदौड

चिखली निवडणूक निकाल : भाजपच्या श्वेता महालेंची विजयी घोडदौड

googlenewsNext

बुलडाणा: विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार श्वेता महाले सहा हजार ८५१ मतांनी आघाडी घेऊन विजयी घोडदौड सुरू केली आहे. काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांचा पराभव निश्चित असून श्वेता महालेंच्या विजयाच्या घोषणेचीच केवळ औपचारिकता बाकी आहे. मतमोजणीच्या फेºयांमध्ये प्रारंभापासूनच श्वेता महाले यांनी आघाडी घेतली होती. टप्प्या टप्प्याने त्यांची ही आघाडी वाढत गेली. त्यांनी ९२ हजार २०५ मते घेतली असून प्रतिस्पर्धी राहूल बोंद्रे यांना ८५ हजार ४३३ मते मिळाली आहेत. श्वेता महाले यांच्या रुपाने चिखलीत भाजपचा १५ वर्षांचा वनवास संपला असून २००४ नंतर प्रथमच येथे कमळ फुलले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ही एक बिग फाईट म्हणून चर्चेत आली होती. त्यामध्ये अखेर श्वेता महाले यांनी येथे बाजी मारली आहे. आता केवळ विजयाच्या घोषणेचीच औपचारिकता बाकी आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ९४ हजार २८० मतदार असून त्यापैकी एक लाख ९२ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची टक्केवारी ६५.४९ टक्के होती.  गेल्यावेळी चिखलीत काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांनी ६१ हजार ५८१ मते घेत भाजपचे सुरेशअप्पा खबुतरे यांचा पराभव केला होता. 

Web Title: Chikhali Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Shweta Mahale win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.