बचत गटातील महिलांची फसवणूक; महिला काढणार तहसील कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:36 IST2025-07-04T16:36:12+5:302025-07-04T16:36:52+5:30
Bhandara : तहसीलदारांना निवेदन

Women in self-help groups cheated; Women will take out a march at the tehsil office
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सावरबंध येथील सीआरपीने केलेल्या घोटाळा पीडित बचतगट महिलांनी या प्रकरणाची योग्य चौकशीच्या मागणीसाठी साकोली तहसीलदारांना निवेदन देऊन ७ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांची उन्नती करण्यासाठी उमेद अंतर्गत गावागावात महिलांचे बचत गट स्थापन करून बँकामार्फत व्याजदरात देण्याची आहे. सरकारी अत्यल्प कर्ज योजना बचत गटांच्या महिलांना याचा योग्य प्रकारे लाभ घेता यावा म्हणून यावर लक्ष देणे व नियंत्रण ठेवणे यासाठी उमेदच्या तालुका कार्यालयातर्फे गाव पातळीवर आयसीआरपी व सीआरपी महिलांची नियुक्ती करण्यात आली.
सावरबंध येथे योजनेंतर्गत १३ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. सावरबंद येथील एका महिलेला नेमण्यात आले. मात्र सीआरपीने बचत गटांच्या अध्यक्ष व सचिवांना आणि महिलांची फसवणूक करून त्यांच्या खात्यावर लाखो रुपयाची उचल केली. जवळपास १७ लाख रुपयांचे जवळपास रकमेची या महिला बचत गटांची फसवणूक करण्यात आली. महिला बचत गटांच्या महिलांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस स्टेशन साकोली व उमेद कार्यालय साकोली यांना तक्रार केली.
मात्र पोलिस विभागाने चौकशीत टाळाटाळ केली. उमेद कार्यालयाला तक्रार केल्यावर त्यांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने सीआरपीवर महिला बचत गटांची फसवणूक केल्याच्या खोट्या सह्या केल्याच्या आणि सरकारच्या अभियानाची सुद्धा फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी काय कारवा होते याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
तहसीलदारांना निवेदन
पोलिस स्टेशनला रिपोर्ट केला नाही. याची दखल घेऊन योग्य चौकशी करुन न्याय मिळावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर ७ जुलै रोजी सावरबंद येथील १३ बचतगट सदस्य महिला आणि गावकऱ्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. मागण्यांचे व मोर्चाच्या आयोजनाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.