नखांवर पांढरे डाग, वेडीवाकडी नखं; कारणं माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:32 IST2025-02-22T14:31:30+5:302025-02-22T14:32:14+5:30
Bhandara : नखे वेडीवाकडी कशामुळे ?

White spots on nails, crooked nails; do you know the reasons?
भंडाराःनखांवरील पांढऱ्या डागांना 'ल्युकोनिशिया' सुद्धा म्हणतात. जेव्हा शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असते तेव्हा नखांवर हे पांढरे डाग दिसतात. खनिज किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असली तरी नखांवर डाग दिसू शकतात.
लोह, प्रथिने, कॅल्शियम व मिनरल्सही आवश्यक
अनेकदा विविध कारणांमुळे शरीरामध्ये लोह, प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता किंवा पोषणातील कमतरता यामुळे नखे ठिसूळ होतात.
नखे वेडीवाकडी कशामुळे ?
कोरडी आणि तुटणारी नखे हे थायरॉइडचे लक्षण असू शकतात. मूत्रपिंड, यकृत, थायरॉइड आणि सोरायसिससारखे आजार असतील तर त्याचा परिणाम नखांच्या वाढीवरही दिसून येत असतो.
वाहनाकडे दुर्लक्ष नको
इन्फेक्शनमुळे नखे तुटण्याचा धोका असतो. तसेच त्यांचा आकारही खराब होऊ शकतो. नखांच्या रंगात, आकारात होणारे बदल आरोग्यासंबंधी काही संकेत देतात.
मुलांच्या नखांवर पांढरे डाग
शाळकरी मुलांच्या नखांवर बऱ्याचदा पांढरे डाग दिसून येतात. पांढरे डाग अनेकदा झिंक म्हणजेच जस्त या खनिजाच्या कमतरतेमुळे असतात. रक्तात हिमोग्लोबिनची आणि लोहाची कमतरता असल्यास नखे गुलाबी रंगाची न दिसता ती पांढरट दिसू लागतात. हाडांमधील कॅल्शियम, झिंक, 'ड' जीवनसत्त्व कमी झाल्याने प्रौढ व्यक्तींमधील नखांवर उभ्या चिरा बऱ्याचदा दिसून येतात.
"प्रत्येकांनी दैनंदिन आहार व विहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नखांवर दिसणाऱ्या कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष करू नये, काही बदल वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनमर्जीने औषधोपचार करू नये."
- डॉ. मधुकर रंगारी, सर्जन व जनरल फिजिशियन