वैनगंगा खवळली! गोसेखुर्दचे ३३ गेट सुरू असूनही पाण्याची पातळी स्थिर नाही
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 9, 2025 14:05 IST2025-07-09T14:04:34+5:302025-07-09T14:05:20+5:30
Bhandara : २१ गेट अडीच मीटरने तर, १२ गेट दोन मीटरने सुरू

Wainganga is agitated! Even though 33 gates of Gosekhurd are open, the water level is not stable
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. यामुळे गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याची पातळीही वाढायला लागली आहे. मागील दोन दिवसापासून सातत्याने ३३ गेट सुरू असूनही पाण्याची पातळी स्थिरावलेली नाही. हा वाढता जलस्तर संतुलित ठेवण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्प व्यवस्थापनाने आज सकाळी ११ वाजता पासून प्रकल्पाचे २१ गेट अडीच मीटरने सुरू केले आहेत, तर १२ गेट दोन मीटरने सुरू आहे. इथून आता १५१५९ जून एक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कारधाचा जलस्तर वाढतीवरच
भंडारा शहरालगत कारधा पुलावरील पाण्याची पातळी सातत्याने वाढतच आहे. आज सकाळी ११ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार येथे २४७.५० मीटर पाण्याची पातळी नोंदविण्यात आली आहे. धोक्याची पातळीवर ही नदी वाहत असून येथे धोक्याची पातळी २४५.५० मीटर आहे.
भंडारा शहरात पुराचे पाणी
कारधा येथील वैनगंगेचा जलस्तर वाढत असल्याने वैनगंगेच्या पुराचे पाणी शहरात फिरत आहे यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली असून पूर्ववादी त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू झाले आहे.