संथगतीने मतदानाला प्रारंभ : भंडारा, तुमसरात सकाळी ९ वाजतानंतर रांगा
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 2, 2025 12:25 IST2025-12-02T12:21:56+5:302025-12-02T12:25:10+5:30
Bhandara : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चारही नगर पालिका मतदार संघांमध्ये सकाळी ७:३० वाजतापासून मतदानाला शांततेत प्रारंभ झाला.

Voting begins slowly: Queues after 9 am in Bhandara, Tumsara
भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चारही नगर पालिका मतदार संघांमध्ये सकाळी ७:३० वाजतापासून मतदानाला शांततेत प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात संथपणे मतदान झाले. मात्र ९ वाजतानंतर मतदारांनी गर्दी केलेली दिसली. विशेषत: भंडारा आणि तुमसरमध्ये अधिक उत्साह दिसला.
सकाळी ९:३० पर्यंत पहिल्या टप्प्यात चारही नगर पालिकांमध्ये सरासरी ६:३४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. भंडारा नगर पालिकेमध्ये ५.७९ टक्के, तुमसरमध्ये ६.०५ टक्के, पवनीमध्ये ८.७३ टक्के आणि साकोली-सेंदूरवाफा येथे ६.६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.