आंतरराज्य सीमेवरील गावात वाघाने इसमाच्या नरडीचा घेतला घोट
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 3, 2025 14:09 IST2025-05-03T14:08:49+5:302025-05-03T14:09:26+5:30
Bhandara : घा घटनेमुळे गावकरी घाबरलेले असून वन विभाग आणि पोलिसांचे पथक पोहचले गावात

Tiger kills a man in village on inter-state border
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर (भंडारा) : अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना आंतरराज्य सिमेवरील कुडवा या गावात घडली आहे. ही घटना २ ते ३ मे च्या रात्री पहाटे ४ वाजताच्या दरम्यान घडली.
कुडवा हे गाव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. या जंगलालगतच्या गावात वाघाची मदशत मागील काही दिवसांपासून होती. घा घटनेमुळे गावकरी घाबरलेले असून वन विभाग आणि पोलिसांचे पथक गावात पोहचले आहे.