Maharashtra Election 2019 ; मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:49+5:30
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ दिव्यांग मतदार आहेत. यासाठी जिल्हा व विधानसभा क्षेत्र स्तरावर दिव्यांग नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

Maharashtra Election 2019 ; मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना सन्मानपूर्वक मतदान करता यावे यासाठी प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यात ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांनी पीडब्लूडी अॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ दिव्यांग मतदार आहेत. यासाठी जिल्हा व विधानसभा क्षेत्र स्तरावर दिव्यांग नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतदान प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना मोबाईलद्वारे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. १९५० या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा दिव्यांग व्यक्तींना माहिती उपलब्ध होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी पीडब्लूडी अॅप तयार केला आहे. या अॅपच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करू शकतो. तसेच अॅपवर मतदान केंद्र शोधणे, तक्रार नोंदविणे, व्हीलचेअरची मागणी करणे, केलेल्या तक्रारींची सूची आणि माहिती उपलब्ध राहणार आहे. मतदान प्रक्रियेबद्दल बेल स्क्रीप्ट मधील वोटर स्लीप देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. डमी ब्रेल बॅलेट कागदांची उपलब्धतता करण्यात आली आहे.
दिव्यांगांना मतदानासाठी रांगेचे बंधन नाही
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर रांग लावण्याची आवश्यकता नाही. त्यांना प्रथम प्राधान्याने मतदान करू दिले जाणार आहे. दिव्यांगांना सुविधांची माहिती व्हावी यासाठी शिक्षक व विषयतज्ज्ञांच्या ७३ मतदान चमूच्या मदतीने ६९३ शाळा गावागावांत घेण्यात आल्या. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदान केंद्राधिकाºयांना प्रती दिव्यांग मतदार ४० रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांगांच्या मदतीसाठी आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मदतनिस म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत.