Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी २४०० अधिकारी, कर्मचारी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:44+5:30
त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १४ व १५ ऑक्टोबर रोजी चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले.

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी २४०० अधिकारी, कर्मचारी सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून भंडारा विधानसभा क्षेत्रातील २४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील हेमंत सेलीब्रेशनमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि तहसीलदार अक्षय पोयाम उपस्थित होते.
राज्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १४ व १५ ऑक्टोबर रोजी चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बुथनिहाय केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी असे चार जण याप्रमाणे भंडारा क्षेत्रातील ४५६ बुथवर २१२४ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले. पहिल्या दिवशी या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत क्षेत्रीय अधिकारी तसेच दुसऱ्या सत्रात ४० सुक्ष्म निरीक्षक यांचा सहभाग होता. यावेळी निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शंकांचे समाधान केले.
भंडारा मतदारसंघात मतदान व मतमोजणीचे प्रशिक्षण
दोन दिवसीय प्रशिक्षणात मतदान व मतमोजणी प्रक्रिया जबाबदारीने कशी पार पाडावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात ईव्हीएम हाताळणे, मतदान प्रक्रियेतील जबाबदारी, अभिरुप मतदान प्रमाणपत्र, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतदान केंद्राध्यक्षांनी करावयाचे घोषणापत्र, नोंदविलेल्या मतांचा हिशेब, मतदानाची टक्केवारी यासोबतच मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन आदी प्रपत्रासोबतच निवडणूक विषयक माहिती देण्यात आली.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षण स्थळी टपाल मतदान सुविधा कक्ष उघडण्यात आला होता. निवडणूक अधिकारी तथा नोडल बॅलेटचे पोस्टल अधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. एबीसी लिफापे, डिक्लेरेशन फॉर्म, सूचना पत्र, टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.