भूमिगत चिखला खाणीत भूस्खलन; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर,
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 5, 2025 12:05 IST2025-03-05T12:04:22+5:302025-03-05T12:05:52+5:30
Bhandara : पुन्हा काही कामगार ढिगार्याखाली दाबल्या गेल्याचा संशय

Landslides in underground Chikhala mines; One dead, two in critical condition.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यातील चिखला येथील मॅग्निज माईनमध्ये सकाळी मोठा अपघात झाला. खाणीमध्ये भूस्खलन झाल्याने त्यात एक कामगार दगावला असून पुन्हा काही कामगार दबून असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातील दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले, एक अद्याप खाणीत ढिगाऱ्याखाली दबलेला असल्याची माहिती येत आहे.
या अपघाताबाबत अद्याप माईन प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. माईन प्रशासन घटना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना आज बुधवारी, 5 मार्चला सकाळी घडली. खाणीच्या प्रवेशद्वारापुढे कामगारांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.