वीज कोसळून रोवणी करताना महिला मजूर ठार, तीन जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 19, 2024 20:30 IST2024-07-19T20:30:01+5:302024-07-19T20:30:19+5:30
एकाच आठवड्यातील सलग तिसरी घटना

वीज कोसळून रोवणी करताना महिला मजूर ठार, तीन जखमी
भंडारा: तुमसर तालुक्यातील मांगली शेत शिवारात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वीज कोसळल्याने रोवणीच्या कामावर असलेल्या एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला मजूर जखमी झाल्या. अन्य २ पुरुष मजूर थोडक्यात बचावले.
अंतकला हिरामण नेवारे (६०, रा. मांगली) असे मृत महिला मजुराचे नाव आहे. तसेच निला नीलकंठ करंडे (६२), शशिकला साहेबलाल शरणागत (५५), विजया मुन्नालाल शरणागत (५७, सर्व रा. मांगली) अशी जखमी महिला मजुरांची नावे आहेत. जखमी महिलांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच देवसर्रा गावात आलेल्या वादळाने अनेक घरांचे छत उडाले आहे. शेतकऱ्यांचे सौर ऊर्जेवरील पॅनलचे नुकसान झाले आहे.
वीज कोसळून महिला मजूर आणि शतेकरी दगावण्याची ही याच आठवड्यातील सलग तिसरी घटना आहे. जिल्ह्यात सध्या रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.