तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 29, 2023 16:45 IST2023-09-29T16:43:46+5:302023-09-29T16:45:37+5:30
मोरगाव (राजेगाव) येथील घटना

तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला
भंडारा : लाखनी तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथे पोहायला गेलेल्या ५० वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २८) रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. महादेव भिवाजी वाघ असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव वाघ याला दारू पिण्याची सवय होता. गुरुवारी मद्यधुंद अवस्थेत तो गाव तलावात पोहायला गेला होता. गाकवऱ्यांनी मनाई केल्यावरही तो पाण्यात उतरला. मात्र खोल पाण्यात गेल्यावर पाण्याबाहेर येताच आले नाही. तो बुडत असल्याचे पाहून काठावरील नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. धावपळ करून उपस्थित नागरिकांनी त्याला तलावातील पाण्याबाहेर काढले, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. गावकऱ्यांनी त्याला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.