कस्टमर केअर सर्च करताना व्हा सावधान; अनेकांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:25 IST2025-05-06T14:24:50+5:302025-05-06T14:25:39+5:30

Bhandara : बँक खात्याची वैयक्तिक माहिती देणे धोकादायक

Be careful when searching for customer care; many have been scammed | कस्टमर केअर सर्च करताना व्हा सावधान; अनेकांना घातला गंडा

Father is a security guard, mother is a maid, daughter wants to become IPS

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
ऑनलाइन फसवणुकीतून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे. त्यातच गुगलची मदत घेणाऱ्यांनाही फसव्या हेल्पलाइनच्या माध्यमातून चुना लागत असल्याची बाब समोर येत आहे. तक्रार नोंद करण्यासाठी कोड स्कॅन करण्याच्या बहाण्याने बँक खाते रिकामे होत आहे. फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण गंभीर होत असून, त्यात भंडारादेखील गुन्हेगारांच्या जाळ्यात फसले आहेत. तरीही अनेकजण गुन्हेगारी पद्धतीबद्दल असलेल्या अज्ञानामुळे गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. त्यामध्ये गुगलची मदत घेणाऱ्यांचाही समावेश दिसून येत आहे.


एखाद्या कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली जाते; परंतु गुन्हेगारांनी अगोदरच हेल्पलाइनच्या नावाने त्यांच्या नंबरचे जाळे पेरलेले असते. त्यावर एखाद्याने तक्रारीसाठी संपर्क साधल्यास वैयक्तिक माहितीवरून बँक खाती रिकामीसुद्धा केली आहेत.


नागरिकांनो, सावध राहा; आमिषाला भुलायचे टाळा'
फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरील आमिषाला बळी पडायचे टाळले पाहिजे. जादा परतावा, दामदुप्पट हे सापळे असू शकतात. त्यामुळे असे आमिष दिसल्यास सतर्कता बाळगतच लिंक व साईट उघडणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


उच्च शिक्षितांसोबत अल्पशिक्षितही गळाला
ट्रेडिंगच्या बहाण्याने, कारवाईचा धाक दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. दिवसेंदिवस उच्च शिक्षितांसोबतच अल्पशिक्षितदेखील गळाला लागत असल्याचे या घटनांवरून दिसून येते.


अशा प्रकारे झाली फसवणूक

  • ऑफरची लिंक पाठवून त्यावर माहिती जाणून एकाची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे अशा फसव्या लिंकपासून सावध राहणे गरजेचे आहे.
  • बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ओटीपी नंबर मागून खात्यातून पैसे गहाळ केल्याचीही घटना घडली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळांचा हेल्पलाइन नंबर शोधण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच जाऊन तिथल्या नंबरवर संपर्क साधला पाहिजे. नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो.


कुठे कराल तक्रार ?
ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास गुन्हा स्थानिक पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे वर्ग केला जातो.


२५ गुन्हे महिन्याला सरासरी घडतात घटना
सायबर गुन्ह्यांच्या नोंदणीचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. पोलिस विभागाने यावर उपाय म्हणून चॅटबोट अॅप आणले असल्याने जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.


"कुणालाही आपल्या बँक खात्याची वैयक्तिक माहिती ओटीपी, एटीएम पीन नंबर देऊ नका. आमिष देणाऱ्या लिंक असतील किंवा कोणत्याही लिंक ओपन करताना पूर्णतः शहानिशा करूनच लिंक ओपन करावी. फसवणूक झाल्यास लगेच जवळील पोलिसांना माहिती द्या."
- नुरूल हसन, पोलिस अधीक्षक, भंडारा

Web Title: Be careful when searching for customer care; many have been scammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.