भंडाऱ्यात बँकेपाठोपाठ दूध संघातही काँग्रेसला धक्का
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: July 30, 2025 16:03 IST2025-07-30T15:55:21+5:302025-07-30T16:03:52+5:30
Bhandara : दुग्ध सहकारी संघाच्या अध्यक्षपदी विलास काटेखाये विजयी

After banks, Congress also faces setback in Bhandara milk association
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा दुग्ध सहकारी संघातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपच्या नेतृत्वातील सहकार विकास पॅनलने अखेर बाजी मारली. बुधवारी (३० जुलै) झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या गटाचे विलास काटेखाये विजयी झाले. यामुळे सहकार क्षेत्रात आता बँकेपाठोपाठ दुध संघातही खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांना हा धक्का मानला जात आहे.
या दुध संघाच्या निवडणुकीत १२ उमेदवार निवडून आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपचे सहकार आणि काँग्रेसचे शेतकरी पॅनलमधून प्रत्येकी ६ संचालक निवडून आले होते.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलचे विलास काटेखाये यांना ६ तर, शेतकरी विकास पॅनलचे विवेक पडोळे यांना ५ मते मिळाली. या गटाचे एक संचालक अनुपस्थित राहिल्याने काटेखाये यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.