हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:19 IST2025-08-23T14:13:14+5:302025-08-23T14:19:12+5:30
Hartalika Vrat 2025 Puja Vidhi Sahitya List: हरितालिका व्रताची पूर्वतयारी कशी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका तृतीया व्रत पूजन साहित्य यादी, जाणून घ्या...

हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
Hartalika Vrat 2025 Puja Vidhi Sahitya List:चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता झाली आहे आणि भाद्रपद महिना सुरू झाला आहे. भाद्रपद महिन्यात अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. महाराष्ट्र, भारतासह संपूर्ण जगात जिथे गणेशोत्सव साजरा केला जातो, तिथे या उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण असते. तत्पूर्वी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत केले जाते. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. हरितालिका व्रत कधी आहे? हरितालिका व्रत पूजनात कोणते साहित्य असणे आवश्यक आहे? जाणून घेऊया...
हरितालिका व्रताच्या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. यंदा भाद्रपद तृतीया तिथी सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून, मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत करावे, असे सांगितले जात आहे.
हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत पूजा साहित्य यादी
हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने १२, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या १२, फळे, नारळ२, गूळ, खोबरे, बांगडयाने फणी, गळेसरी, पंचामृत - साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) ५ खारका, ५ बदाम.
- सौभाग्यवाणाचे साहित्य: तांदूळ, १ नारळ, १ फळ, १ सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगडया ४, हळद, कुंकू डब्या २, सुटी नाणी पाच रुपयांची, सौभाग्यवाण देणे शक्य नसल्यास, यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी.
- हरतालिका व्रत पूजेतील पत्री: १) अशोकाची पाने २) आवळीची पाने ३) दूर्वाकुर पत्रे ४) कण्हेरीचीं पाने ५) कदंबाची पाने ६) ७) धोत्र्याची पाने ८) आघाड्याची पाने ९) सर्व प्रकारची पत्री १०) बेलाची पाने
- हरतालिका व्रत पूजेतील फुले: १) चाफ्याची फुले २) केवडा, ३) कण्हेरीची फुले, ४) बकुळीची फुले, ५) धोतऱ्याची फुले ६) कमळाची फुले, ७) शेवंतीची फुले, ८) जास्वंदीची फुले, ९) मोगऱ्याची फुले, १०) अशोकाची फुले.