Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव: गणपती बाप्पाच्या पूजेनंतर म्हणा ‘ही’ २१ नावे अन् व्हा चिंतामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 03:03 PM2021-09-09T15:03:09+5:302021-09-09T15:04:15+5:30

Ganesh Chaturthi 2021: गणेशाच्या या नामस्मरणामुळे अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते.

ganesh chaturthi 2021 chunt these 21 names of ganesh after puja vidhi for peace and relief from anxiety | Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव: गणपती बाप्पाच्या पूजेनंतर म्हणा ‘ही’ २१ नावे अन् व्हा चिंतामुक्त

Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव: गणपती बाप्पाच्या पूजेनंतर म्हणा ‘ही’ २१ नावे अन् व्हा चिंतामुक्त

googlenewsNext

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्यामुळे वातावरणात एक प्रकारचे चैतन्य, उत्साह संचारला आहे. गणपती आगमनाची लगबग आणि आतुरता वाढत चालली आहे. गणपती उपासकांसाठी वर्षभरातील तीन तिथी सर्वाधिक महत्त्वाच्या आणि गणपती नामस्मरण, उपासना, आराधनेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. यंदा १० सप्टेंबर २०२१ पासून गणोशोत्सव साजरा केला जात आहे.

गणेशोत्सव: तुम्ही नियमितपणे गणपती अथर्वशीर्ष म्हणता? ‘हे’ १० नियम जाणून घ्या

देशभरातील गणेशभक्त या दिवसात पार्थिव गणपती पूजन करतात. प्रत्येक घरातील कुळधर्म, कुळाचार, मान्यता आणि परंपरांनुसार दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस, दहा दिवस असे गणपती पूजन केले जाते. गणेशाच्या आराधना उपासनेसाठी कोणतीही तिथी असो, त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात. यासह नामस्मरणही केले जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' पाच गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल!

आजच्या काळात चिंता नाही, असा कोणी मनुष्य शोधून सापडणार नाही. चिंता, काळजी, अडचणी दूर होण्यासाठी देवाकडे मागणे मागितले जाते. घरात सुख, समाधान, आनंद, चैतन्य येण्यासाठी माणूस काही ना काही करत असतो. विघ्नहर्ता गणपती बाप्पा सगळी विघ्न दूर करतो, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. माणसाचे मन शांत असेल, तर अनेक कामे सहजतेने होऊ शकतात, असा अनेकांचा अनुभव आहे. चिंतामुक्त होण्यासाठी तसेच मनाला शांतता लाभण्यासाठी पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या २१ नावांचे पठण करावे. गणेशाच्या या नामस्मरणामुळे अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

श्रीगणेश चतुर्थी: गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा

गणपती बाप्पाची २१ नावे

१. गणंजयाय नमः
२. गणपतये नमः
३. हेरम्बाय नमः
४. धरणीधराय नमः
५. महागणपतये नमः
६. लक्षप्रदाय नमः
७. क्षिप्रप्रसादनाय नमः
८. अमोघसिद्धये नमः
९. अमिताय नमः
१०. मंत्राय नमः
११. चिंतामणये नमः
१२. निधये नमः
१३. सुमंगलाय नमः
१४. बीजाय नमः
१५. आशापूरकाय नमः
१६. वरदाय नमः
१७. शिवाय नमः
१८. काश्यपाय नमः
१९. नंदनाय नमः
२०. वाचासिद्धाय नमः
२१. ढुण्ढिविनायकाय नमः
 

Web Title: ganesh chaturthi 2021 chunt these 21 names of ganesh after puja vidhi for peace and relief from anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.