Maharashtra Election 2019 ; In the presence of Ravi Rana, a feminine power should be thanked | Maharashtra Election 2019 ; रवि राणांच्या उपस्थितीत नारीशक्ती कृतज्ञता मेळावा
Maharashtra Election 2019 ; रवि राणांच्या उपस्थितीत नारीशक्ती कृतज्ञता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याणनगर येथे गुरुवारी नारीशक्ती सन्मान, कृतज्ञता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मेळाव्यात रवि राणा यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले. मतदारसंघातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला मालकी हक्काचे घर देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करू, असे आश्वासन राणांनी दिले. महिलांना स्वयंरोजगारातून उद्योगनिर्मिती याद्वारे हजारो हातांना काम मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. मतदारसंघातील आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास आपण प्रयत्नशील असल्याचेही रवि राणा म्हणाले.


Web Title: Maharashtra Election 2019 ; In the presence of Ravi Rana, a feminine power should be thanked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.