In Amravati 59 positive, total number of corona patients 914 | अमरावतीत ५९ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१४ 

अमरावतीत ५९ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१४ 

अमरावती : महापालिकाद्वारा स्थापित ‘रॅपिड अँटिजन’ चाचणी केंद्रातून प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या ९१४ वर पोहचली आहे. बडनेरा शहरात एकाच दिवशी १४ संक्रमित आढळून आले आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या ३२ वर पोहोचली आहे.

सकाळी प्राप्त अहवालानुसार, रामपुरी कॅ म्प येथील ३१ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील ७६ वर्षीय महिला, अमरावती येथील श्रीनाथवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगरातील ६० वर्षीय महिला, १५ मुलगी, अंबिकानगरातील ३९ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, एसबीआय कॉलनी ३४ वर्षीय महिला, मार्डी मार्गावरील हॉर्ट हॉस्पिटल येथील २१ वर्षीय महिला, फ्रेजरपुरानजीकच्या गजाननगर येथील ३६ वर्षीय पुरुष, अंबापेठ येथील ३२ वर्षीय पुरुष, कंवरनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, राजेंद्र कॉलनी येथील १४ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खिराळा येथील ४५ वर्षीय पुरुष, राजापेठ येथील ५५ वर्षीय पुरुष, धारणी तालुक्यातील बिजुधावडी येथील २७ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, वलगावच्या संताजी चौक येथील ५५ वर्षीय महिला,  रुक्मिणीनगर येथील ३६ वर्षीय पुरुष, माधवीविहार येथील १२ वर्षीय युवक, परतवाडा हबीबनगर येथील ३८ वर्षीय पुरुष, तपोवन ६० वर्षीय महिला,  ३० वर्षीय महिला व २८ महिला वर्षीय, तपोवन परिसरातील माधवीविहार येथील ३५ वर्षीय पुरुष, गजानननगरातील ३५ व ३७ वर्षीय महिला, राहुलनगरातील ६३ वर्षीय ४९ वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरुष, ग्रेडर कैलासनगरात २३ व ३० वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, वृंदावन कॉलनीत ३५ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, चपराशीपुरा ४० वर्षीय महिला, हमालपुरा २८ वर्षीय पुरुष, साईनगर  येथील १९ वर्षीय महिला, बसस्थानक  जैन होस्टेलच्या मागे २० वर्षीय पुरुष, सहकारनगरातील ३२ वर्षीय पुरुष,  कांतानगरात एक असे एकूण ४५ तर  बडनेरा नवीवस्तीच्या संभाजीनगर येथील ४५ व ४२ वर्षीय पुरुष, हरिदास पेठ येथील २८ वर्षीय महिला, तर पवननगर येथे सहा, जुनीवस्तीच्या माताफैल येथील ४० व ८० वर्षीय पुरुष, १९ वर्षीय महिला, जुनीवस्तीच्या टिळकनगर येथील २१ वर्षीय महिला व २१ वर्षीय पुरुष, असे १४ संक्रमित आढळून आले आहेत.

Web Title: In Amravati 59 positive, total number of corona patients 914

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.