‘रासप’चा बाळापूर मतदारसंघावर दावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:02 IST2019-09-13T15:01:54+5:302019-09-13T15:02:02+5:30
रासपतर्फे अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त

‘रासप’चा बाळापूर मतदारसंघावर दावा!
अकोला : राष्टÑीय समाज पक्षाला राज्यात १० ते १२ जागा मिळणार असल्याची शक्यता राष्टÑीय समाज पक्षाने वर्तविली असून, यात रासपतर्फे अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून रासपच्या जिल्हा कार्यकारिणीला प्राप्त झाल्या आहेत.
महादेवराव जानकर प्रणित राष्टÑीय समाज पक्ष राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीसोबत आहे. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात जानकर दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून रासपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तथापि, जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचाच धर्म पाळत घटक पक्षांना विधानसभेच्या समाधानकारक जागा सोडल्या जाणार आहेत. यामध्ये राष्टÑीय समाज पक्षाची १२ जागांची मागणी असल्याचे रासपच्या सूत्रांनी सांगितले.
विधानसभेच्या १२ जागांची मागणी करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधासभेची जागा आम्ही मागितली आहे. याबाबत पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष महादेवराव जानकर सकारात्मक असून, ही जागा आम्हाला निश्चित मिळणार असल्याचे संकेतही पक्षाने दिले आहेत.
- सतीश हांडे,
जिल्हाध्यक्ष राष्टÑीय समाज पक्ष, अकोला.