Nilesh Lanken's blessing of Nandkumar Jhavern | निलेश लंकेंना नंदकुमार झावरेंचे आशिर्वाद
निलेश लंकेंना नंदकुमार झावरेंचे आशिर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सर्वसामान्य तरुणाच्या पाठिशी आपले आशिर्वाद कायम राहतील, असा शब्द झावरे यांनी दिला. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे हेही उपस्थित होते.
नंदकुमार झावरे हे गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना आमदार विजय औटी यांच्यासोबत राहिले होते. तालुक्यात झावरे यांना मानणारा मोठा गट आहे. सामान्यांचे राजकारण तालुक्यात उभे रहावे, अशी भूमिका बाळासाहेब विखे यांनी घेतली होती. तीच भूमिका पुढे नेण्याचे काम आपण करीत राहू, असा शब्द झावरे यांनी लंके यांना दिल्याचे सांगण्यात येते.
झावरे व लंके यांच्यामध्ये सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत लंके यांच्या प्रचारात सक्रीय झावरे सक्रीय होणार की नाही, याबाबत निश्चित माहिती हाती आलेली नाही. मात्र, झावरे यांनी लंके यांच्याबाबत सकारात्मकता दाखवित सामान्यांच्या राजकारणाला आपला पाठिंबा असल्याचे सुतोवाच केले आहे. पुढील पाच दिवसात झावरे आपला निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येते.


Web Title: Nilesh Lanken's blessing of Nandkumar Jhavern
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.