अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:30 IST2019-12-20T12:29:03+5:302019-12-20T12:30:23+5:30

निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन घेऊन मौन आंदोलनास प्रारंभ केला.

Anna Hazare's silent movement begins; Hang the accused in the fearless case | अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

पारनेर : निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाबांचे दर्शन घेऊन मौन आंदोलनास प्रारंभ केला.
देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या प्रकरणातील अनेक निकाल वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुध्दा आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवरील अत्याचार करणा-या नराधमांचे धाडस वाढत आहे. असे प्रकार हे दुर्दैवी आहेत. २०१२ पासून संसदेत ज्युुडीसीईल हा कायदा प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होईल. पोलीस ठाण्यात महिलांना एखादी तक्रार दाखल करायची झाल्यास तेथे पुरुष कर्मचारी, अधिकारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी, अधिकारी यांना नेमण्यात यावे. राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
.....
 

Web Title: Anna Hazare's silent movement begins; Hang the accused in the fearless case