बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; अकोले तालुक्यातील घटना, कानाला घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:43 IST2020-03-20T17:42:52+5:302020-03-20T17:43:53+5:30
अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी येथील रहिवासी महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करुन जखमी केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; अकोले तालुक्यातील घटना, कानाला घेतला चावा
अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी येथील रहिवासी महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करुन जखमी केले आहे.
हाच बिबट्या शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जवळच असलेल्या उगलेवाडीत एका घरात घुसला होता. वन विभागाचे कर्मचारी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी तिकडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ७.५५ वाजता अकोले येथील १०८ नंबरच्या गाडीला बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ही खबर मिळाली. गाडीचालक दत्ता देशमुख यांनी डोंगरवाडी गाठली. जखमी दिनकर बांबळे यांना उपचारासाठी घेवून ते नाशिकला गेले. त्यांच्यासोबत वन विभागाचे कर्मचारी होते. या बिबट्याने आणखी दोघांवर हल्ला चढवीला होता. यात आणखी एक बाभुळवंडी येथील महिला जखमी झाली आहे. अद्याप तिचे नाव समजू शकले नाही. दिनकर यांच्या उजव्या कानाला बिबट्याने चावा घेतला आहे.