Lokmat Agro >हवामान > उजनी धरणातून १२ मेच्या पुढे सीना नदीत पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

उजनी धरणातून १२ मेच्या पुढे सीना नदीत पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

Water will be released from Ujani Dam into Sina River after May 12; Water Resources Minister orders | उजनी धरणातून १२ मेच्या पुढे सीना नदीत पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

उजनी धरणातून १२ मेच्या पुढे सीना नदीत पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

Ujani Dam उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला.

Ujani Dam उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीतपाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला.

१२ मेपासून सीना नदीतपाणी सोडण्यात येईल, असे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी दिले.

कुरुल शाखा कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ व उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.

यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना संपर्क साधला. आ. देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाणी उजनीचे पाणी सीना नदीत सोडले नाही तर होणान्या पिकांच्या नुकसानीची जाणीव करून दिली.

मंत्री विखे-पाटील व आ. देशमुख यांनी उजनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १२ मेपासून कुरुल शाखेतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तसे पत्र कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिले.

आंदोलनात राम जाधव, विशाल जाधव, रामभाऊ खटके, नीळकंठ कानडे, संतोष सावंत, समाधान अवताडे, शुभम अवताडे, संतोष अवताडे, संजय वाघमोडे, बळी बंडगर, संजय शिंदे, गोपाळ सुरवसे, लक्ष्मण जाधव शेतकरी सहभागी झाले होते.

तसेच समाधान गायकवाड, घनश्याम पाटील, अण्णा जावळे, राजू मल्लाव, अमर जाधव, संजय जाधव, तुकाराम पवार, युवराज पवार, रत्नाकर पवार, बालाजी गुंड, अशोक गुंड, रुखमा गुंड आदी शेतकरी सहभागी झाले होते.

अधिक वाचा: या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झाली गारपीट; विटेच्या आकाराच्या पडल्या गारा

Web Title: Water will be released from Ujani Dam into Sina River after May 12; Water Resources Minister orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.