नातेपुते : नीरा नदीवरील वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातूननदीपात्रात १५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला.
धरण १०० टक्के भरल्याने आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतातील जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन केले आहे.
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे धरण महत्त्वाचे असल्याने, पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली आहे. सध्याचा विसर्ग पाहता नदीपात्रात जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: राज्यात 'या' ठिकाणी हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार