गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील १३ धरणे ओव्हरफ्लो झाली असून धरणातून विसर्गही कायम आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अद्यापही कमी पावसाची नोंद झाली असतानाही धरणसाठयात मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जास्त साठा आहे.
शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि घाटमाथ्याच्या परिसरातही चांगलाच पाऊस होत आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातही चांगलाच पाऊस होत असल्याने अनेक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग टक्के पावसाचीच नाँद म्हणून आतापर्यंत करण्यात आली आहे ऑगस्ट महिन्यात सरासरी २३२.५ मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते.
यंदा मात्र २७ तारीख उलटल्यानंतरही १४०.६. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. काही तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी मालेगाव, बागलाण, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांनी सरासरी वाढविण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यातील सरासरीपेक्षा केवळ ६० ओलांडली आहे.
जून महिन्यापासून ऑगस्ट अखेरपर्यंत विचार केला असता सरासरीच्या ७८.८ टक्के पावसाची नोंद झाली असून ५६४.७ मिलिमीटर पाऊस तीन महिन्यात नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला या तालुक्यांनी सरासरी ओलांडल्याचे दिसून येत आहे. अद्यापही पावसाळ्याचा एक महिना बाकी असून महिनाभरात पाऊस सरासरी गाठेल अशी दाट शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असतानाही धरणामध्ये मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जास्त साठा दिसून येतो आहे. तब्बल तेरा धरणांनी शंभरी गाठली असून इतरही सर्व धरणे ८० टक्केच्या पुढे गेली आहे. मागील वर्षी ८३ टक्के असलेला साठा यंदा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
त्यामुळे या हंगामात झालेला पाऊस धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होते आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग असल्याने जायकवाडीकडे आत्तापर्यंत ६ लाख ५३ हजार ७१७ क्युसेक वेगाने ५६ टीएमसी पाणी रवाना झाले आहे.
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
धरण | विसर्ग | धरण | विसर्ग |
दारणा | ६१०८ | पालखेड | ३३२० |
कश्यपी | ६४० | पुनेगाव | ४५० |
वालदेवी | ४०७ | ओझरखेड | ४४३ |
आळंदी | ४४६ | नांदूरमध्यमेश्वर | १९,९१७ |
भावली | ५८८ | वाकी | ३९२ |
भाम | १५११ | कडवा | ११७६ |
वाघाड | १०५८ | मुकणे | ३६३ |
तिसगांव | ६८ | गौतमी गोदावरी | ५७५ |
करंजगाव | ११३० | - | - |
हेही वाचा : राज्यातील मका उत्पादकांना यंदा लागली मुरघासाची ओढ; धान्य उत्पादन घटणार का?