Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

Significant change in weather; Rain with stormy winds in some parts of the state, heat wave in others | Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

Maharashtra Rain & Heat Wave Update: राज्यभरातील कमाल तापमान चढेच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असतानाच दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत आहे.

Maharashtra Rain & Heat Wave Update: राज्यभरातील कमाल तापमान चढेच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असतानाच दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत आहे.

Maharashtra Rain & Heat Wave Update: मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा खाली आला असला तरी राज्यभरातील कमाल तापमान चढेच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असतानाच दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत आहे. राज्यात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील व मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेने दिलासा दिला असून, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

विजांचा कडकडाट होईल आणि वादळी वारे वाहतील. तर १३ आणि १४ मार्च रोजी उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईच्या हवामानात बऱ्यापैकी फेरबदल नोंदविण्यात येत असून, रात्रीचे हवामानही उष्ण आहे.

१३ ते १७ मार्चपर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

१५-१६ मार्च या दोन दिवशी विदर्भ-मराठवाड्यासह धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी स्वरूपाच्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

१४ मार्चपर्यंत अलिबाग, डहाणू, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा येथे उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

Web Title : मौसम में बदलाव: महाराष्ट्र में कहीं बारिश, कहीं लू

Web Summary : महाराष्ट्र के मौसम में बदलाव हो रहा है। कुछ क्षेत्रों में तूफान और बारिश होगी, जबकि अन्य लू का सामना करेंगे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा और विदर्भ में गरज के साथ बारिश हो सकती है। उत्तरी कोंकण में लू चल सकती है। मुंबई का मौसम बदल रहा है और रातें गर्म हैं। अन्य क्षेत्रों में बादल छाए रहेंगे और हल्की बारिश हो सकती है।

Web Title : Weather Fluctuations: Rain with Storms, Heatwave in Maharashtra

Web Summary : Maharashtra's weather is fluctuating. Some areas will experience storms and rain, while others face heatwaves. Central Maharashtra, Marathwada, and Vidarbha may see thunderstorms. North Konkan could have a heatwave. Mumbai's weather is changing with warm nights. Other regions may have cloudy skies and light rain.