कोल्हापूर : संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या तसेच शेवटच्या टप्प्यातील 'मघा' नक्षत्रातील पाऊस उद्या, मंगळवार, (दि. २६) ते शुक्रवार (दि. २९) म्हणजे हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून काहीसाच सक्रिय होऊन, मध्यम पावसाची शक्यता आहे.
विशेषतः हा पाऊसकोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्रीच्या कुशीतील जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या आणि कालवे पात्रात अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पूर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असाही अंदाज खुले यांनी व्यक्त केला आहे.
स्ट्रॅटो-क्युमुलस, 'निंबो-स्ट्रॅटस' प्रकारच्या ढगातून सातत्य ठेवून संथगतीने थंडावा पसरवणारा हा ऑगस्ट महिन्यातील बेभरवशाचा 'मघा' नक्षत्राचा पाऊस होत आहे.
बंगालच्या उपसागरात, आज, सोमवारी होणारा एम.जे.ओ.चा प्रवेश, इशान्य मध्य प्रदेशावर तयार होणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि वायव्य दिशेकडे होणारे त्याच्या मार्गक्रमणाची शक्यता, दक्षिणेकडे सरकेल असा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम मान्सूनचा आस या वातावरणीय प्रणालीतून पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ
अधिक वाचा: e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?