Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनची धडक; या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनची धडक; या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Monsoon hits Madhya Maharashtra, Marathwada; Orange alert for these six districts | मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनची धडक; या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनची धडक; या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Monsoon Update 2025 मुंबई आणि पुण्यात एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनने बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत धडक दिली आहे.

Monsoon Update 2025 मुंबई आणि पुण्यात एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनने बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत धडक दिली आहे.

मुंबई आणि पुण्यात एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनने बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत धडक दिली आहे.

पुढील २४ तासांमध्ये विदर्भाच्याविदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यताही आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

कोकण आणि गोव्यात पाच दिवसांत व विदर्भात गुरुवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी अमरावती भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने बुधवारी विदर्भात मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे.

आता तो गडचिरोलीत पोहचल्याची घोषणा वेधशाळेतर्फे करण्यात आली. मात्र घोषणेच्या एक दिवसापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगलाच तडाखा दिला.

बुधवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांचीही दाणादाण उडवली. बुधवारी सकाळपर्यंत अमरावतीत ४५.२ मि.मी. पाऊस बरसला.

अधिक वाचा: खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर? कसा घ्याल लाभ?

Web Title: Monsoon hits Madhya Maharashtra, Marathwada; Orange alert for these six districts