Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon rains) जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची नोंद होत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हवामानाचा अचानक बदल झाला असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Pre-monsoon rains)
काही भागांत ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pre-monsoon rains)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण परिसरात हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. येत्या २४ तास पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Pre-monsoon rains)
विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथा परिसरात ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा तसेच वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Pre-monsoon rains)
राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, ३१ मे पर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. (Pre-monsoon rains)
२५ मेपर्यंत मान्सूनचे वारे वाहू लागतील, २७ मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टा व पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यंदा मान्सून वेळेआधीच ६ दिवस महाराष्ट्रात दाखल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.(Pre-monsoon rains)
दरम्यान, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर यांसह ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ३०-४० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Pre-monsoon rains)
राज्यात जोरदार झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. गेल्या आठ दिवसांपासून रोज होत असलेल्या पावसाने कापणीला आलेले पीक पूर्णतः भुईसपाट होत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. (Pre-monsoon rains)
सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलांमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pre-monsoon rains)
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकऱ्यांनी विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* वीजांच्या कडकडाटासह पाऊस असल्याने शेतामध्ये विजेच्या खांबांपासून दूर राहावे.
* आकाशात वीज चमकत असताना शेतीकाम करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.