Join us

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:07 IST

Maharashtra Weather Update : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. गुरूवारी बह्मपुरी येथे देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथे तापमानाचा पारा हा सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. वाचा हवामान अंदाज सविस्तर (Heat wave)

Maharashtra Weather Update : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. गुरूवारी बह्मपुरी येथे देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथे तापमानाचा पारा हा सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला.(Heat wave)

यंदा एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा सर्वाधिक जाणवत आहे. जगातील सगळ्यात जास्त उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या बह्मपुरी, चंद्रपूरसह इतर शहरांचा समावेश आहे. राज्यातील कमाल तापमान साधरणपणे ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे.(Heat wave)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या उष्ण व दमट हवामान बघायला मिळत आहे. त्यातच आज(२५ एप्रिल) रोजी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. तर नांदेड, अकोला, सोलापूर, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड, लातूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज (२५ एप्रिल) रोजी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील तापमान साधारणपणे ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले. पुण्यातील किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात आणि मुंबई आकाश निरभ्र राहील.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Weather Updates) किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये निरभ्र आकाश असू शकते.(Nashik Temperature Today)

नागपूरमधील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये (Heat Wave In Vidarbha) उष्णतेची लाट कायम आहे. (Nagpur Temperature Today)

राज्यात शुक्रवारी संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे. पण उकाडा जास्त असेल. त्यामुळे नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी. उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* वाढत्या तापमानामुळे आणि वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेची लाट कायम; IMD ने जारी केला अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकणनाशिकनागपूरमुंबईपुणे