Maharashtra Weather Update: राज्यात मागील आठवड्यात किमान तापमानात घट होताना दिसली. आता ढगाळ वातावरणात वाढ होताना दिसत आहे. त्यात मराठवाडा मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि कोकणमध्ये पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने हवामान ढगाळ आहे. गारठा कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज तापमानात वाढ होणार असून अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्राकार (Cyclone) वारे सक्रिय झाले असून राजस्थान आजूबाजूच्या भागापासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.
परिणामी उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात चढ-उतार होत आहे. हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब हरियाणामध्ये प्रचंड गारठा वाढलाय. दाट धुक्याची (Fog) चादरही पाहायला मिळली.
राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने ढगाळ वातावरण आहे. परिणामी किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे.
राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झाले असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: नाशिक, कोकण, उत्तर महाराष्ट्रात कसे असेल हवामान; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर