Join us

Maharashtra weather: राज्यातील 'या' जिल्ह्यात अवकाळीचा सर्वाधिक धोका; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:32 IST

Maharashtra Weather Update News : राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (५ मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आजही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (unseasonal weather)

Maharashtra Weather Update News : राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी  पोषक अशी वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (५ मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. (unseasonal weather)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांमध्ये राज्याच्या कोकण भागापासून मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.(unseasonal weather)

 मुंबईत देखील ६ ते ८ मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीसे ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळक सरींची बरसतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  (unseasonal weather)

राज्यात तीन दिवस पावसाचे?

राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपार गेला असतानाच पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर मुंबईतही ६ आणि ७ मे रोजी पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीबरोबरच गारपिटीची शक्यता आहे.

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये ६ व ७ मे, मराठवाड्यात ७ मे, विदर्भात ५ मे रोजी अवकाळीबरोबर गारपिटीची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकण ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर विदर्भात ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

उष्णतेच्या झळांनी विविध जिल्ह्यांत नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढे तापमान राज्यभरात नोंदवले जात आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहेत.

शेतकऱ्यांना सल्ला

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचे संकट; वाचा आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडानाशिकमुंबईपुणेअहिल्यानगर