Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Update : राज्यात या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : rain with lightning expected in these districts of the state; Yellow alert issued | Maharashtra Rain Update : राज्यात या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे मराठवाड्यातील जळगाव, संभाजीनगर तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह कमाल तापमान कमी जास्त होण्याचा होण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसाने उघडीप झाल्याने तापमान आणि उकाड्यातही वाढ झाली आहे.

पावसाने उघडीप दिली असली तरी कोकणातील दापोली, दोडामार्ग येथे तसेच उर्वरित कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली.

राज्यात ढगाळ हवामानासह तीव्र उन आणि उकाडा कायम आहे. मंगळवारी (ता. ३) विदर्भातील तापमानात काही अंशाने वाढ झाली आहे.

आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी वारा, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मान्सून जागा सोडेना
यंदा मान्सून वेळे अगोदर येऊन धडकला पण अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने जवळपास आठवडाभरापासून मान्सूनची हालचाल थांबली आहे.

अधिक वाचा: नारायणगाव बाजारात चक्क केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; कसा मिळाला भाव?

Web Title: Maharashtra Rain Update : rain with lightning expected in these districts of the state; Yellow alert issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.