बालाजी बिराजदार
गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यानंतर दुपारी एकूण ८ वक्र द्वारे २० सेंटिमीटरने व २ वक्र द्वारे १० सेंटीमीटरने उघण्यात आले असून, एकूण ६८५० क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.
मागील काही दिवसांत प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सहा दरवाजे उघडून ५७.८६१ घनमीटर प्रति सेकंद वेगाने विसर्ग सोडण्यात आला होता.
त्यानंतर दोन दिवसांत शनिवारी परत सकाळी साडेसहा वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण ४ द्वार हे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्राच्या विसर्गात वाढ करण्यात आला आहे. परत दुपारी एकूण ८ वक्रद्वारे २० सेंटिमीटरने व २ वक्रद्वारे १० सेंटीमीटरने चालू असून, एकूण ६८५० क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.
सतर्कतेचा दिला इशारा
पाण्याच्या या वाढत्या विसर्गामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालक यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
निम्न तेरणा प्रकल्पाचे शाखा अभियंता एस.बी. गंभीरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठच्या लोकांना गोठे, घरे, विजेच्या मोटारी, शेतीपिके, जनावरे आणि अन्य मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले.
हेही वाचा : करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे