गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टीएमसी अधिक पाणीसाठा असला तरी यंदा मान्सून कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामानाचा अंदाज बघता यावर्षी उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्ट अखेर काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन मुख्य अभियंता सुचेता डुंबरे यांनी सांगितले.
उजनी जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १९.८६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण ८३.५२ टीएमसी पाणी साठा आहे. गेल्या वर्षी ९.२४, तर एकूण ७२.२४ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या उजनी धरणातून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, सीना माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव व भीमा सीना जोड कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू आहे.
१ मेपर्यंत भीमा नदीतून नदीकाठच्या गावांना पाणी पुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी ४ ते ५ टीएमसी पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार आहे. तसेच त्यानंतर पंढरपूर आषाढी वारी अशी दोन आवर्तन पुढील तीन महिन्यात भीमा नदीद्वारे उजनीतून सोडली जाऊ शकतात. गेल्या वर्षी मे महिन्यात मान्सून पूर्व पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी १८ एप्रिल २५ रोजी मृत साठ्यात गेलेले उजनी २७ मे रोजी मृत साठ्चातून बाहेर आले होते.
जुलै, ऑगस्टअखेर अडचणीचे ठरणार
उजनी साधारण एप्रिलअखेर मृत साठ्यात जाते. यावर्षी उन्हाळा जाचणार नसला तरी मान्सून पाऊस लांबल्यास जुलै, ऑगस्टअखेर अडचणीचे ठरणार आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसावर उजनी धरणाचे भवितथ्य अवलंबून असते.
ऑक्टोबर २०२३ मध्ये उजनी धरण केवळ ६६ टक्के भरले होते. २१ जानेवारी २४मध्ये मृत साठ्यात गेले होते. गेली दोन वर्षे उजनी शंभर टक्के भरत असून, चालू वर्षात मान्सून किती प्रमाणात पडतो, यावर पुढील साठा अवलंबून आहे.
नीरा खोऱ्यासह वीर धरणात मुबलक पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ११ टक्के अधिक
• सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या वीर धरणाची यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून, बुधवारी (दि.१) पाणी पातळी ५१ टक्के झाली आहे.
• गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी यंदा पाणीसाठा जास्त असल्याने शेतकरी वर्गासह धरणाबर अवलंबून असणाऱ्या शहरासह ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
• यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने नौरा खोऱ्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले होते. याचा फायदा धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना होत आहे.
• सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील धरण साखळीत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
• एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरण या चार धरणांत तब्बल ४९.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
• वीर धरणात निम्म्याहून अधिक साठा असल्याने जूनच्या आठवडधापर्यंत दुसऱ्या सिंचन सुरळीत राहण्याची चिन्हे आहेत.
• फलटण, माळशिरस, पंढरपूर, बारामती हजारो शेतकन्यांची शेती या धरणांवर अवलंबून आहे. सध्या या चार धरणांत एकूण सुमारे २३.८८५ टीएमसी साठा आहे.
• गतवर्षीपेक्षा यावर्षी पाच टक्के टीएमसी साठा आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीही सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
• २०२५-२६ च्या पावसाळ्यात झालेल्या मुबलक पावसामुळे यंदा उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
• परिणामी, शेतकऱ्यांनी रब्बी पिके, फळबागा तसेच चारा पिकांवर भर दिला असून, अनेकांनी चार पिकांची पद्धत अवलंबत उत्पन्न वाढविले आहे. हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे.
• दरम्यान, वीर धरणातून सध्या शेतकऱ्यांच्या नौरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेक, तर उजव्या कालव्यात १,५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
• त्यामुळे नदीकाठच्या व कालव्यालगतच्या सिंचनाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची माहिती उप अभियंता राहुल मिसाळ यांनी दिली.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
