Lokmat Agro >हवामान > Monsoon 2025 : मान्सून ऑनटाइम, पण पेरणी ऑफटाइम? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Monsoon 2025 : मान्सून ऑनटाइम, पण पेरणी ऑफटाइम? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

latest news Monsoon 2025: Monsoon on time in Maharashtra, but sowing off time? Know the advice of experts | Monsoon 2025 : मान्सून ऑनटाइम, पण पेरणी ऑफटाइम? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Monsoon 2025 : मान्सून ऑनटाइम, पण पेरणी ऑफटाइम? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Monsoon Update: मेघगर्जनेसह पावसाने दक्षिण कोकण आणि गोव्याला झोडपून काढत महाराष्ट्रात सुपरफास्ट प्रवेश केला आहे. यंदा मान्सून (Monsoon 2025) नेहमीच्या वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला असून, कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Monsoon Update)

Maharashtra Monsoon Update: मेघगर्जनेसह पावसाने दक्षिण कोकण आणि गोव्याला झोडपून काढत महाराष्ट्रात सुपरफास्ट प्रवेश केला आहे. यंदा मान्सून (Monsoon 2025) नेहमीच्या वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला असून, कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Monsoon Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Monsoon Update: मेघगर्जनेसह पावसाने दक्षिण कोकण आणि गोव्याला झोडपून काढत महाराष्ट्रात दिमाखात प्रवेश केला आहे. यंदा मान्सून  (Monsoon 2025) नेहमीच्या वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला असून, कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon Update)

मात्र, हवामानतज्ज्ञांचा दिलेल्या सल्ला असा आहे की, खरीप पेरणीची घाई करू नका. जमिनीत वाफसा होईपर्यंत प्रतीक्षा करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. (Sowing Off Time)

यंदाचा मान्सून महाराष्ट्रात ११ दिवस आधीच दाखल झाला आहे. काल शनिवार (२४ मे) रोजी मान्सून केरळ व तामिळनाडू ओलांडून कर्नाटकात पोहोचला. (Monsoon 2025)

आज (२५ मे) रोजी तो संपूर्ण गोवा व्यापून दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी व कुडाळपर्यंत पोहोचत महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला आहे. (Maharashtra Monsoon Update)

कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा इशारा

संपूर्ण आठवड्यात (३१ मेपर्यंत) मुंबईसह संपूर्ण कोकणातील सातही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे.

उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

कोकण वगळता खान्देश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील २९ जिल्ह्यांमध्ये रविवार (२६ मे) व सोमवार (२७ मे) या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होऊन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

खरीप पेरणीबाबत तज्ज्ञांचा इशारा

* मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत आधीच ओल आहे. आता मान्सूनने लवकरच प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई होऊ शकते. मात्र, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना वेळेआधी पेरणी टाळण्याचा सल्ला दिला आहे.

* मे महिन्यातली अवकाळी पावसाची ओल आणि जूनमधील खरा मान्सूनी थंडावा यात फरक असतो. त्यामुळे पेरणीसाठी योग्य 'वाफसा' स्थिती जूनमध्ये तयार होईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

* लवकर पेरणी केल्यास पीक नुकसान होण्याचा धोका.

* जमीन थंड झाल्यावरच योग्य  'वाफसा' स्थिती तयार होते.

* पावसाचा अंदाज व जमीन स्थिती पाहून निर्णय घ्यावा.

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : रेड अलर्ट ऑन! कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा वाचा सविस्तर

Web Title: latest news Monsoon 2025: Monsoon on time in Maharashtra, but sowing off time? Know the advice of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.