Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसाने झाली आहे. हवामान विभागाने ( IMD) मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून पुढील ७२ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.(Maharashtra Weather Update)
कोकणाला थोडा दिलासा मिळालेला असला तरी शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार,राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून अनेक भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
दसऱ्याच्या दिवशी बदलले हवामान
सप्टेंबर महिनाभर मुसळधार पावसाने हैराण केलेल्या कोकण किनारपट्टीला आज (२ ऑक्टोबर) थोडासा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज पावसाला ब्रेक मिळालाय.
रस्ते, खालचे भाग आणि नाले यांमध्ये साचलेले पाणी ओसरत असून वाहतूक पूर्ववत होत आहे.
आज दिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलकी रिमझिम अशी स्थिती राहणार आहे.
हवामान विभागाने आज मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जिल्हे : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर
विदर्भातील जिल्हे : अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
या सर्व भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी, तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे
IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामानात मोठे बदल दिसून येणार आहेत.
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
विजांचा कडकडाट
काही भागांत वादळी वारे
या दरम्यान शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान बदलांविषयी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काय असेल अंदाज
पुणे : ढगाळ वातावरण, हलका पाऊस
कोल्हापूर, सातारा, सांगली : तुरळक ठिकाणी सरी
मुंबई व पुणेकरांसाठी हवामान विभागाने सौम्य पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्रासाठी ऑक्टोबरची सुरुवातही चिंतेची ठरते आहे. कोकणात दिलासा मिळाला असला तरी मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी आहे. पुढील ७२ तास हे राज्यासाठी निर्णायक ठरणार असून शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
* सोयाबीन, तूर, कापूस, ऊस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.