Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर

latest news Maharashtra Weather Update: Will it rain on the eve of Ganeshotsav? What is the weather forecast? Read in detail | Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. वाचा सविस्तर(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. वाचा सविस्तर(Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)

कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर गणेशोत्सव काळात नागरिकांना वाहतूक आणि प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.(Maharashtra Weather Update)

२६ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.

समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग प्रतितास ५० किमीपर्यंत पोहोचेल.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोर

पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस.

विशेषतः घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

काही वेळा पावसाचा जोर कमी-जास्त होत राहणार.

मराठवाडा व विदर्भात पावसाचा धोका

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नागपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्यातील हवामानावर दिसून येत आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* अचानक वाढलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर रोग व कीड प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला आहे.

* शेतकऱ्यांनी रोगनियंत्रणासाठी योग्य फवारण्या तातडीने कराव्यात.

* पिकांमध्ये पाणी साचू नये याची विशेष काळजी घ्यावी.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : कुठे मुसळधार तर कुठे विजांच्या कडकडाटासह पाऊस; जाणून घ्या IMD रिपोर्ट

Web Title: latest news Maharashtra Weather Update: Will it rain on the eve of Ganeshotsav? What is the weather forecast? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.