Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज आणि उद्या (१३-१४ ऑगस्ट) राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज १३ ऑगस्ट आणि उद्या १४ ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
गडचिरोली, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
कोणत्या भागांत पावसाचा इशारा?
विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई व पुण्यातील हवामान
मुंबई आज १३ ऑगस्ट) रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पुणे येथे हलका ते मध्यम पाऊस पडणार असून वातावरण ढगाळ राहील.
प्रशासनाचा इशारा
हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाच्या काळात गरजेशिवाय बाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे आणि हवामानाबाबत सतत अपडेट घेत राहावे.
देशातील पावसाची स्थिती
गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेटे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. तर उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, झारखंड आणि उत्तर मध्य प्रदेशात काही ठिकाणी पावसाची तीव्रता जास्त राहिली.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशक फवारणी पुढे ढकला.
* फवारणी केल्यास पावसाने औषध वाहून जाऊन खर्च वाया जाईल, असा सल्ला देण्यात आला आहे.