Maharashtra Rain News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज( २५ सप्टेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, वादळी वाऱ्यांसह इशारा देण्यात आला आहे..
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता (Konkan Rain Forecast)
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी : वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस.
सिंधुदुर्ग : हलका ते मध्यम पाऊस.
पालघर : मध्यम पावसाचा अंदाज.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 25, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/nMpDmL5dwq
मध्य महाराष्ट्रात अधूनमधून सरी बरसतील
धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर, अहमदनगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात आकाश ढगाळ राहील आणि सरींचा क्रम सुरू राहील.
मराठवाड्यात पिकांना धोका
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस तर परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत अधूनमधून सरींचा अंदाज आहे.
या भागात सध्या कापूस आणि सोयाबीन पिके जोमात आहेत. पावसामुळे या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भातील अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया : काही ठिकाणी मुसळधार पाऊस.
भंडारा, नागपूर, वर्धा : वादळी वाऱ्यासह पाऊस.
चंद्रपूर, गडचिरोली : अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता.
प्रशासनाने या भागात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकऱ्यांनी पिकांची नियमित तपासणी करावी.
* पिकांत पाणी साचणार नाही यासाठी निचरा व्यवस्था करावी.
* उभ्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर योग्य फवारणी करावी.
