Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. सूर्य मावळताच आभाळ काळे ढग होणार, विजा कडाडणार आणि वारे वेगाने वाहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.(Maharashtra Weather Update)
दिवसभर तापमानात चढ-उतार होत असतानाच सायंकाळ होताच अनेक भागांमध्ये काळ्या ढगांनी आभाळ व्यापलं. कुठे वाऱ्याच्या जोरदार झोतांनी थरकाप उडवला, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना ऐकायला मिळाली. (Maharashtra Weather Update)
अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सायंकाळीच हजेरी लावल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांमध्येही थोडीशी धावपळ दिसून आली.(Maharashtra Weather Update)
येत्या २४ तासांत कसं राहणार हवामान?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या २४ तासांमध्येही हेच चित्र कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाचे आगमन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहू शकतो, त्यामुळे काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान तुलनेने कोरडे राहील, पण पहाटे तापमानात घट जाणवेल.
परतलेला मान्सून की नव्या प्रणालीचा परिणाम?
सध्या राज्यात पावसाची हजेरी लागल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. 'मान्सून परतलाच का नाही?'
अरबी समुद्राच्या आग्नेयेला, म्हणजे लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात, कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. या प्रणालीमुळे पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
याचसोबत बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतोय. त्यामुळे राज्यात दिवाळीच्या आठवड्यातदेखील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वाढली आहे.
मागील २४ तासांत राज्यातील बहुतांश भागांत सायंकाळी ढगाळ वातावरण दिसून आलं. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना झाली. काही जिल्ह्यांमध्ये अल्पकाळासाठी धो-धो पाऊस झाला, ज्यामुळे हवेतील गारवा वाढला.
पुढील काही दिवसांसाठी सावध राहा
हवामान विभागाने, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटादरम्यान सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
उघड्या जागेत थांबू नये.
शेतकऱ्यांनी वीजवाहिन्यांपासून दूर राहावे.
वाऱ्याचा वेग वाढल्यास हलक्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.