Maharashtra Summer Weather Update: राज्यात उन्हाळ्याची तीव्र चाहूल लागली असून कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. IMD ने ४ आणि ५ मार्च रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. उष्णता आणि आर्द्रता वाढल्याने पुढील ४८ तास महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
मार्चपासूनच उष्णतेचा पारा चढता
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. मार्चअखेर कमाल तापमान ३७°C ते ३८°C पर्यंत जाऊ शकते, तर एप्रिल-मे महिन्यात उष्णतेचा कडाका शिखरावर जाण्याचा अंदाज आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटा (Heatwave) निर्माण होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
अकोला : ३८°C (राज्यातील उच्चांक)
मुंबई : २९°C ते ३३°C (ढगाळ वातावरणाची शक्यता)
पुणे : २६°C (स्वच्छ आकाश)
नागपूर : २७°C (धुरकट वातावरण)
सोलापूर: ३१°C (स्वच्छ)
नाशिक: २४°C (आल्हाददायक)
विभागनिहाय स्थिती
विदर्भ: तापमानाचा पारा ४०°C च्या दिशेने सरकत आहे. काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
मराठवाडा व मध्य महाराष्ट्र: दुपारच्या सत्रात उष्णतेची तीव्रता जास्त जाणवणार.
कोकण पट्टा: आर्द्रता जास्त; उकाडा वाढण्याची शक्यता.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. मागील आठवड्यात विदर्भातील काही भागांत झालेल्या हलक्या पावसामुळे हवामानात तात्पुरता बदल झाला; मात्र आता पुन्हा तापमान वाढीचा कल स्पष्ट झाला आहे.
'एल निनो'ची शक्यता
पुढील काही महिन्यांत 'एल निनो' परिस्थिती विकसित होऊ शकते. यामुळे तापमानात वाढ आणि पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी पुढील निरीक्षणांनंतरच होणार आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला
* दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर पडणे टाळा.
* पुरेसे पाणी प्या; हलके व सूती कपडे वापरा.
* लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
* उष्माघाताची लक्षणे (डोकेदुखी, चक्कर, मळमळ) जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. किनारपट्टी भागात यलो अलर्ट, तर विदर्भात वाढता पारा या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी IMD च्या सूचनांचे पालन करूनच उष्णतेचा सामना करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सकाळी लवकर/सायंकाळी पाणी द्या; दुपारच्या उन्हात सिंचन टाळा.
* मल्चिंग (आच्छादन) वापरून जमिनीतील ओलावा टिकवा.
* ठिबक/फवारणी सिंचनाला प्राधान्य देऊन पाण्याची बचत करा.
