Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? वाचा सविस्तर

latest news Maharashtra Weather Update: Rain clouds will thunder again; Where is the Meteorological Department's alert? Read in detail | Maharashtra Weather Update : पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर(Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Update)

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे लक्ष देऊन पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत मिळत असून, हवामानातील ही घडी फार महत्त्वाची आहे. खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व योग्य उपाययोजना करण्याची हीच वेळ आहे.(Maharashtra Weather Update)

हवामानाचा आढावा

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे बहुतांश भागांत उकाड्याचा त्रास वाढला होता. मात्र, आज (६ ऑगस्ट २०२५) पासून हवामानात पुन्हा बदल होण्याची चिन्हं आहेत.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर दिसणार आहे.

हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून, या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.

मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या  जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

विजांसह हलक्या सरींची शक्यता

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूरमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने दामदार हजेरी लावली होती.

उष्णतेत वाढ 

पावसाची विश्रांती घेतल्यानंतर राज्यभर उष्णतेचा तीव्र अनुभव येत आहे. चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर अनेक जिल्ह्यांत तापमान ३० अंशांच्या वर असून, उकाडा प्रचंड वाढला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* खरीप पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपायायोजन कराव्यात.

* जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत करा .

* जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Maharashtra Weather Update: Rain clouds will thunder again; Where is the Meteorological Department's alert? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.