Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असून, १३ ते १९ ऑगस्ट दरम्यान राज्यभर पावसाचा जोर वाढणार आहे.(Maharashtra Weather Update)
श्रावणसऱ्या नुकत्याच कमी झाल्या, तोच राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वाढली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या हालचालींमुळे पुढील ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने अनेक भागांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)
पावसाचं कारण काय?
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यासोबतच अरबी समुद्रातही पावसासाठी पूरक अशा हवामानातील हालचालींना गती मिळाली आहे. या दोन्ही प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे मान्सून पुन्हा जोर धरत असून, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
कुठे जास्त पाऊस पडणार?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे येत्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर येथे ऑरेंज अलर्ट जारी.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा, कोल्हापूर घाटमाथा येथे यलो अलर्ट.
नागपूर, वर्धा, गडचिरोली येथे यलो अलर्ट.
नेमकं काय घडलं?
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्हीकडून आलेल्या हवामानातील हालचालींनी मान्सून पुन्हा जोर धरताना दिसत आहे.
कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाच्या सरींना वेग आला आहे.
१३ ते १९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
पूरप्रवण भागात सतर्कता.
वीज-पावसात बाहेर जाणे टाळावे.
हवामान खात्याचे अपडेट लक्षपूर्वक पाहावेत.
शेतकऱ्यांना सल्ला
* जोरदार पावसामुळे पिकांच्या मुळाजवळ पाणी साचू देऊ नका. निचऱ्याची सोय करून घ्या.
* फळधारणा सुरू असलेल्या पिकांना आधार द्या, जेणेकरून वाऱ्याने किंवा पावसाने पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.