Maharashtra Weather Update : रक्षाबंधनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर कोकण, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
डोंगराळ भागात भूस्खलनाचा आणि सपाट भागात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. (Maharashtra Weather Update)
जुलै महिन्यात पावसाचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऑगस्ट महिन्यात पाऊस दमदार बॅटिंग करत आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि शेतीत ओलाव्याचा अतिरेक यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
पावसाचा अंदाज
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे येथे मुसळधार पाऊस होईल.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागात मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी वीजांचा कडकडाट होईल.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली येथे मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यलो अलर्ट जाहीर
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून, समुद्रावरून येणारा दमट वारा आणि लो प्रेशर झोनमुळे पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता नाही.
मुंबईत पावसाची शक्यता
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, संध्याकाळपासून जोरदार सरींची शक्यता आहे. दुपारी अचानक पावसाचा धक्का बसू शकतो, तर रात्री वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
या भागात सतर्कता
डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळावा.
नद्या, ओढे व नाल्यांजवळ जाणे टाळावे.
पावसात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.
राज्यात पावसाची हजेरी पुढील आठवडाभर कायम राहणार असून, पावसासोबतच नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतीत पिकांच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी.
* ढगाळ व ओलसर हवेत तांबेरा, करपा, मावा, अळी यांचा प्रादुर्भाव वाढतो. शेतात नियमित पाहणी करून योग्य वेळी उपाययोजना करावी.