Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. पुढील २४ तासांत राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Maharashtra Weather Update)
कोकण-विदर्भात पूरस्थितीची शक्यता व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील २४ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भ या भागांत पावसाचा सर्वाधिक परिणाम जाणवणार असून काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.(Maharashtra Weather Update)
कोकण व मुंबईत यलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाच्या सरी सक्रिय होतील. काही भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात मुसळधार पाऊस
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
मराठवाड्यात विजांचा कडकडाट
लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.
पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी
अहमदनगर, नाशिक आणि जालना जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे. इथे पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे.
सतर्क राहा
कोकण व विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे तसेच आपत्कालीन स्थितीत तातडीच्या व्यवस्थेसाठी तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
* निचऱ्याची सोय करून अतिरिक्त पाणी बाहेर काढा.
* सोयाबीन, कापूस, भात, मका यांसारख्या पिकांमध्ये पाणी तुंबल्यास मूळ कुजण्याचा धोका वाढतो.