Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांमध्ये आज (९ मे) रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (IMD Issues Rain Alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जो वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड सारख्या भागातून जात आहे. त्यामुळे पावसाळी आणि वादळी हवामानाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (IMD Issues Rain Alert)
राज्यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (IMD Issues Rain Alert)
काही भागात ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (IMD Issues Rain Alert)
मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येथील तापमान ३० अंश सेल्सियसच्या आसपास राहील, तर रात्रीच्या वेळी २८ अंश सेल्सियसपर्यंत खाली येईल. पुण्यात दिवसा २९-३० अंश सेल्सियस तापमान आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. (IMD Issues Rain Alert)
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर भागांतही हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नागपूर आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. (IMD Issues Rain Alert)
मराठवाड्यात कुठे बरसणार?
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
विदर्भात कुठे पाऊस?
विदर्भात वाशिम, नागपूर, अकोला, गोंदीया, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा गडचिरोली आणि वर्धा येथे पाऊस येत्या चार दिवसात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.