Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय हवामान विभागाने ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाची छाया दिसत आहे. हवामान विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने चेतावणी दिली आहे की, ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान 'शक्ती' चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
या काळात ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे, तर काही ठिकाणी ६५ किमी प्रतितास झंझावाती वारे वाहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
'शक्ती' चक्रीवादळाची दिशा आणि तीव्रता
'ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्र. ०३' नुसार, हे चक्रीवादळ सध्या अरबी समुद्राच्या मध्यभागात सक्रिय असून, उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढील काही तासांत ते आणखी तीव्र होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र किनारपट्टीवर दिसेल.
यलो अलर्ट जारी
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना इशारा
हवामान खात्याने ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र अतिशय खवळलेला राहील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश
पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये.
आधीच समुद्रात गेलेले मच्छीमार लवकरात लवकर किनाऱ्यावर परत यावेत.
बोट आणि जाळी सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत.
शेतकऱ्यांना सल्ला
आधीच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आणखी संकट घेऊन येऊ शकतो.
शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात नागरिक आणि शेतकरी दोघांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्ती चक्रीवादळाचा परिणाम किती तीव्र होतो, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, पुढील काही दिवस वादळी वारे आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाणी साचू न देणे, बांध बांधणे आणि विद्युत उपकरणांपासून दूर राहणे यासारखी काळजी घ्यावी.