Maharashtra Heatwave : राज्यात एप्रिल अखेरपासूनच उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत असून विदर्भात उष्णतेचा कडाका अधिक जाणवत आहे.(Maharashtra Heatwave)
विशेषतः अकोला येथे शुक्रवारी तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला.(Maharashtra Heatwave)
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या मध्य भारतासह महाराष्ट्रातील अंतर्गत भागात उष्णतेची लाट कायम असली तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(Maharashtra Heatwave)
मेच्या सुरुवातीला दिलासा, पण नंतर पुन्हा तापमान वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत, विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात रात्रीच्या तापमानात किंचित घट होऊ शकते. त्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी जाणवेल.
मात्र, हा दिलासा फार काळ टिकणार नाही. मे महिन्याच्या मध्यावरून पुढे पुन्हा किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उन्हाचा जोर पुन्हा वाढेल.
कोकणात उकाडा कायम
कोकण पट्ट्यात उष्णतेपासून फारसा दिलासा मिळणार नाही. हवेत वाढलेल्या बाष्पामुळे उकाडा आणि घामाची तीव्रता अधिक जाणवत राहील. विशेषतः मुंबई शहरात दमट उष्णता नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, २६ एप्रिलपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह महानगर परिसरातही हलक्या सरींचा अंदाज आहे. या पावसामुळे तापमानात तात्पुरती घट होण्याची शक्यता असली तरी दमट वातावरण कायम राहील.
हवामान अभ्यासक अश्रेय शेटटी यांच्या मते, सध्या हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. रविवारपर्यंत असेच दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस)
* अकोला – ४५°C
* अमरावती – ४२.६°C
* जालना – ४३.४°C
* नाशिक – ४३.२°C
* कोल्हापूर – ४२.६°C
* बुलडाणा – ४१.५°C
* बीड – ४१.५°C
* धाराशिव – ४०.४°C
* रत्नागिरी – ३७.२°C
* मुंबई – सुमारे ३५-३६°C
राज्यात सध्या उष्णतेचा जोर कायम असला तरी मेच्या सुरुवातीला थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, हा दिलासा तात्पुरता ठरणार असून मेच्या मध्यापासून पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षणाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
